जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात वाहनामध्ये घरगुती गॅस भरताना अचानकपणे झालेल्या स्फोटात जखमी सहाव्या रुग्णाचा देखील उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देवेश भरत दालवाले (वय १९, रा. यमुना नगर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, इच्छा देवी चौकामध्ये घरगुती गॅसचा वापर खाजगी वाहनांमध्ये भरत असताना अचानक स्पोट झाल्याने १० जणांचा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला होता.
खासगी वाहनामध्ये गॅस भरताना इच्छादेवी चौकामध्ये गॅस टाकीचा स्फोट होऊन वाहनासह आजूबाजूच्या दुकानाला आग लागली होती. त्यात ११ जण भाजले गेले होते. या घटनेतील ११ जखमींपैकी पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दालवाले कुटुंबीतील लहान मुलगा देवेश याचा सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.