वेतनश्रेणी मान्यतेसह विविध मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण कार्यालयात प्रलंबित असलेले नियमित वेतनश्रेणी मान्यता, सुधारित मान्यता शालार्थ मान्यता प्रस्ताव प्रकरणे मार्गी लावावे, या मागणीसाठी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघातर्फे मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात प्रलंबित असलेल्या नियमित वेतन श्रेणी मान्यता, नियमित वेतन श्रेणी सुधारित मान्यता, शालार्थ मान्यता प्रस्ताव, अप्रशिक्षित पदवीधर वेतन श्रेणीतून पदवीधर वेतन श्रेणी मान्यतांची मागणीसाठी जळगाव, भुसावळ, रावेर, चोपडा येथील शाळेतील शिक्षकांचे प्रलंबित कामे मार्गी लावावे यासाठी यापुर्वी १५ नोव्हेंबर रोजी संघटनेच्या माध्यमातून प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली होती. त्याचप्रमाणे १६ नोव्हेंबररोजी आमदार किशोर दराडे व शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या उपस्थितील शिक्षण दरबार कार्यक्रमात मान्यता देवून कार्यवाहीच्या सुचना देण्यात आल्या होत्या. याबाबत कारवाई न झाल्याने १८ नोव्हेंबर, २५ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबर रोजी शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रलंबित कामे मार्गी लावण्याची विनंती देखील केली होती. परंतू या प्रकरणांकडे दुर्लक्ष होत असल्याने मंगळवार ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content