पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा केला. यावेळी काँग्रेसच्या हातावर उबाठा सेनेची राखी बांधण्याचा योग आल्याने एकच चर्चा होती.
पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्षाबंधन निमित्ताने महाविकास आघाडीचे घटक पक्षांनी एकत्र येऊन रक्षाबंधन साजरे केले. यावेळी शिवसेनेच्या उबाठा सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, प्रताप पाटील, इरफान मन्यार, राहुल शिंदे, कल्पेश येवले, जिभाउ पाटील आदींना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
या कार्यक्रमाला शिवसेना उबाठाचे अरुण पाटील, पप्पू राजपुत, अनिल सांवत, भरत खंडेलवाल, तिलोत्तमा मौर्य आदि उपस्थितीत होते. यावेळी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांनी येणाऱ्या निवडणुकीत एकमेकांना प्रामाणिक सहकार्य करण्याचे बंधन करण्यात आले.