फैजपूर प्रतिनिधी । अरे संसार संसार.. माणसा माणसा कधी होशील माणूस.. खोप्यामंदी खोपा… अशी अजरामर लोकगीते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी रचली असून त्या फक्त खान्देशच्याच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचे वैभव आहे, असे मत डॉ.अजित थोरबोले यांनी व्यक्त केले. तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण आणि उत्सव समितीच्या वतीने आयोजित खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी डॉ. थोरबोले बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, राष्ट्रीय सण आणि उत्सव समितीचे चेअरमन प्रा.डॉ.आय.पी.ठाकूर यासोबत प्राध्यापक डॉ. सतीश चौधरी, प्राध्यापक डॉ.आर.पी.महाजन, प्रा.डॉ. जगदीश पाटील, प्रा.डॉ.जी.एस.मारतळे, प्रा.डॉ.ए.के. पाटील, प्रा.डॉ.जे.जी.खरात, प्रा.डॉ.ताराचंद सावसाकडे, प्रा.डॉ.मारोती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.आय.पी.ठाकूर यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.डी.एल. सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन सपकाळे, चेतन इंगळे, शेखर महाजन, अमोल राणे यांनी परिश्रम घेतले.