पुणे प्रतिनिधी । पुणे-मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर तांत्रिक अडचणी आल्यामुळे सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस तब्बल 8 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच लोणावळा ते कर्जत दरम्यान हे दुरुस्तीचं काम हाती घेतले जाणार आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.