पहिली पत्नी असतांना दुसरीशी रेशीम गाठ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहिली पत्नी असतांना तरुणाने दुसरीशी विवाह करीत संसार थाटल्याचा प्रकार जीवन नगरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता फसवणुक व अत्याचार केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जीवन नगरात राहणार्‍या सत्यजित रविंद्र सोनवणे याचा पहिला घटस्फोट होवून त्याचा भाग्यश्री सत्यजित सोनवणे यांच्याशी विवाह झाला आहे.

दरम्यान, विवाहिता पतीसह सासरी नांदत असतांना पती सत्यजीत यांच्या मोबाईलमध्ये विवाहितेला एका महिलेसोबत लग्नाचे फोटो दिसले. त्यांनी पतीला याबाबत विचारणा केली, परंतु त्याने विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण करीत हे फोटो खोटे असल्याचे सांगितले. त्यानंतर विवाहितेने माहेरच्यांना बोलावून घेत सासरच्यांना जाब विचारलला व मारहाण केली.

मारहाणीच्या घटनेनंतर 8 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच विवाहावेळी विवाहेच्या वडीलांनी 15 ग्रॅमची चैन, 10 ग्रॅमचे कानातले टोंगल व पतीला 5 ग्रॅमची अंगठी असे दिले होते. परंतु सासरच्यांनी एक महिना चांगली वागणुक दिली त्यानंतर त्यांच्याकडून मानसिक व शाररीक छळ सुरु झाला. पतीचा पहिली पत्नी असतांना दुसरा विवाह करीत विवाहितेची फसवणुक केल्याप्रकरणी सत्यजित सोनवणे त्याचे वडील रविंंद्र चिंधू सोनवणे, आई उषा सोनवणे तिघ रा. जीवननगर, बहीण दिपाली सुधिर शिंदे रा. शांतीनगर, किरण अशोक यशवंद उल्हासनगर, सुदर्शन वाल्हे रा. सत्यमपार्क शिवाजी नगर यांच्याविरुद्ध फसवणुक व विवाहितेचा छळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Protected Content