कोल्हापूर । खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मूक मोर्चा आंदोलन सुरू करण्यात आले असून यात सर्वपक्षीय नेत्यांसह समाजबांधव सहभागी झाले आहेत.
मराठा आरक्षणासाठी आधी इशारा दिल्यानुसार आज पहिला मूक मराठा मोर्चा कोल्हापुरात निघाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा निघाला. या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पक्षाच्या आरक्षणाला समर्थन असल्याचे जाहीर केले आहे. मराठा मोर्चात सहभागी, नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे, मराठा समाजासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल, येत्या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाबद्दल मूलभूत मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.