पाचोऱ्या उद्या स्वाक्षरी मोहीम

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राज्यात सद्यस्थितीत सुरु असलेले भोंगे प्रकरणाविषयी समाजामध्ये शांतता प्रस्थापित राहावी, या उद्देशाने जिल्हा पोलिस दल, जळगांव अंतर्गत पाचोरा पोलिस स्टेशनतर्फे उद्या सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी “स्वाक्षरी मोहीम” आयोजित करण्यात आली आहे.

“आरती असो वा अजान, एकात्मतेतंच सर्वांचे कल्याण” असा या स्वाक्षरी मोहिमेतुन संदेश सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम पाचोरा पोलिस स्टेशनतर्फे करण्यात येणार आहे. या स्वाक्षरी मोहिमेचे उद्घाटन पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते होणार असुन याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, आ. दिलीप वाघ, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी सह सर्व पक्षीय पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील सह सर्व पोलिस अधिकारी / कर्मचारी यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!