Home Cities जळगाव W फोरम तर्फे उद्या जाहीर स्वाक्षरी मोहीम

W फोरम तर्फे उद्या जाहीर स्वाक्षरी मोहीम

0
33

जळगाव, प्रतिनिधी | उत्तर प्रदेशातील उन्नाव रेप केस आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातच मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. मुलींच्या सुरक्षेसाठीच W फोरम तर्फे उद्या शनिवार ३  ऑगस्ट रोजी शिवतीर्थ मैदान (जी. एस.ग्राउंड) स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.

शिवतीर्थ येथे सकाळी १० ते सायं ५ यावेळेत जळ्गावकर नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वाक्षरीचे निषेध निवेदन आणि पीडित कन्येला न्याय आणि सुरक्षा मिळण्यासंदर्भाच्या मागण्या जिल्हाधिकारीनमार्फत पंतप्रधान मोदी यांना पाठवण्यात येणार आहे. तरी समस्त नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत आपला निषेध नोंदवावा अशी विनंती Wफोरम तर्फे करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound