औरंगाबाद प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सिडको बसस्थानकाच्या जागी लवकरच बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रियेचे काम सुरु असून त्याची मुंबईत प्री-बीड बैठक झाली आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात बसपोर्ट उभारण्यात येणार होते. मात्र, खासगी भांडवलदार निविदा भरण्यास उत्सुक नसल्याचे समोर आले. त्यामुळे एसटी महामंडळाने सिडको बसस्थानकावर बसपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ट्रान्सफर-लीज’ तत्त्वावर आधुनिक बसपोर्टसह व्यापारी संकुल बांधून महामंडळास विनामूल्य हस्तांतर करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. याबाबत मुंबई येथे प्रक्रिया सुरू असून ती विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पूर्ण केली जाणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी बसपोर्टचे भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. त्या सगळ्यासाठी निविदेला कंत्राटदारांचा किती प्रतिसाद मिळतो, याकडे महामंडळाचे लक्ष आहे.