पहूर,ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर व परिसरात जुगार, सट्टा , खुलेआम मद्य विक्री तसेच अवैध धंदे बोकाळले असून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यासाठी पहूर गावकरी मंडळी तर्फे पहूर पोलीस स्टेशनला आज निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पहूर परिसरातील बेकायदेशीर अवैध धंद्यामुळे व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असून वरदळीच्या जागी हे व्यवसाय सुरू असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाचे या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत असून प्रशासनाने त्याची दखल घेऊन सदर अवैधरित्या चालणारे सर्व व्यवसाय बंद करण्यात यावे.
अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य महेश अशोक पाटील, विशाल सुभाष पाटील, शिवराज भास्कर देशमुख, राहुल चंद्रकांत पांढरे ,सचिन राजेंद्र पाटील, उमेश विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.