जळगाव प्रतिनिधी । महिलांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अरिहंत मार्गी महिला मंडळातर्फे बुधवार दि. १० जुलै रोजी दुपारी 3 ते 4 यावेळेत प्रसिध्द कँन्सर तज्ञ डॉ. निलेश चांडक यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अरिहंत मार्गी महिला मंडळातर्फे आज महिलांमधील वाढते कँन्सरचे प्रमाण वाढत असल्यामुळे यावर डॉ. निलेश चांडक हे मार्गदर्शन करणार आहे. जैन संघटनेच्या आर.सी.बाफना स्वाध्याय भवन हॉटेल क्रेझी होमच्या मागे गणपती नगर येथे दु ३ ते ४ यावेळेत हे व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन अरिहंत मार्गी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता कोचर यांनी केले आहे.