रावेर, प्रतिनिधी | पालक म्हणून आपली भूमिका निभावत असतांना आपल्या मुलांचे भवितव्य मोबाईल व टीव्हीच्या अतिरेकामुळे अंधारमय होत आहे. याचे भान ठेवणे आवश्यक असून याच्या दुष्परिणामांची जाणीव करवून घेणे आवश्यक आहे. मुलांचे चांगले भविष्य घडवायचे असेल तर मोबाइल व टीव्हीचा अतिरेक टाळावा, असे आवाहन फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी सावदा येथे श्रीराम फौंडेशनतर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी स्वामी नारायण गुरुकुल अध्यक्ष स्वामी भक्ती किशोरदास महाराज हे होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, कृउबा संचालक पंकज येवले, तहसीलदार सौ. उषाराणी देवगुणे नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे, वन परिक्षेत्र अधिकारी मुकेश महाजन, गट शिक्षणाधिकारी विजय पवार, जळगाव येथील दर्जी फौंडेशन संचालक गोपाल दर्जी, श्रीराम फौंडेशन अध्यक्ष श्रीराम पाटील, युवा उद्योजक स्वप्निल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या ३५० विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच १३० शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी स्पर्धा परीक्षा आणि त्यासाठीची पूर्व तयारी, कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन याविषयावर सखोल मार्गदशन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तबस्सुम शेख यांनी केले. आभार युवा उद्योजक स्वप्नील पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे धनराज चौधरी, दिपक नगरे, राजू चौधरी, ललित चौधरी, बंडू पाटील, चेतन पाटील, संतोष महाजन, कृष्णा पाटील, नरेंद्र पाटील, हर्षवर्धन तायडे, सुनील पाटील व राजेश पाटील यांनी परिश्रम घेतले.