श्री काथार कंठहार युवा वाणी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा (व्हिडिओ)

WhatsApp Image 2020 01 05 at 9.17.11 PM

जळगाव, प्रतिनिधी | श्री काथार कंठहार युवा वाणी समाज सेवा संघ, जळगाव आयोजित वधु-वर परीचय मेळावा २०२० आज रविवार दि. ५ जानेवारी रोजजी कामळस्कर नगर, सरदार वल्लभभाई पटेल, सभागृह याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात २०० युवक युवतींनी परिचय करून दिला.

वधु-वर पराचय मेळाव्यासाठी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आमदार राजूमामा भोळे, तसेच माजी महापौर विष्णू भंगाळे, म्हाडा- मराठवाडा विभाग सभापती संजय केनेकर, जळगाव काथार समाजाचे अध्यक्ष संतोष बाविस्कर, जेष्ठ समाज बांधव वसंतराव बाविस्कर, मोनाली कामळस्कर फाऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कामळस्कर, फ्रेड असोसिएशन जळगावचे सहल हरणे, तसेच मुंबईचे विनोद बाबूराव वाणी, पुणे प्रतिनीधी अभय चंद्रकांत वाणी, नासिक विभागाचे अध्यक्ष केदार सुलोचने व संत तुकाराम वाणी समाज सेवा समिती अध्यक्ष शिवदास कामळस्कर , आभोणाचे प्रतिनीधी रामदास कामळस्कर, औरंगाबाद येथील चंद्रकांत कथार पिशोरकर, तसेच जेष्ठ समाजबांधव सिताराम चौधरी व विश्वनाथ चौधरी, तसेच शिरसोली येथील अनंत वाणी, मेहरूण येथील रघुनाथ वाणी, पिंप्राळा येथील मोहनदास वाणी, असोदा येथील त्र्यंबक वाणी, जळगाव नवीपेठ मनिष वाणी, जनवाणी ना.सह.पत.अध्यक्ष अजय कामळस्कर, व समाजातील जेष्ठ व श्रेष्ठ मान्यवर व समाजबांधवाच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रास्ताविक युवा अध्यक्ष प्रशांत वाणी यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे हस्ते जीवनसाथी-५ या वधु-वर परीचय पुस्तिकेचे व जनवाणी पतपेढीचे सन २०२० चे कॅलेडर यांचे प्रकाशन करण्यात आले. युवा समिती अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहण्यांच्या मनोगतातून मेळाव्याला शुभेच्छा देण्यात आले. तसेच भावी वर-वधु यांना योग्य जोडीदार मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मेळाव्यात २०० युवक-युवतींनी आपला परीचय दिला. परीचय देणाऱ्या युवक-युवतींना सरप्राईज गिफ्ट देण्यात आले. मेळाव्या प्रसंगी वधु-वर परीचय पुस्तिकेचे वितरण नाममात्र शुल्क घेवून त्यामध्ये नाविन्यपूर्ण गिफ्ट ही विविध आयोजकातर्फे देण्यात आले. वधु-वर परीचय मेळाव्यास काथार वाणी समाजातील महाराष्ट्र , गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातून समाजबांधव आपल्या उपवर मुला-मुलींचे परीचय देण्यासाठी उपस्थित होते. तसेच  या मेळाव्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नासिक, जळगाव व इतर जिल्ह्यातून देखील समाज बांधव आले होते. समाजातील जेष्ठ व श्रेष्ठ समाजबांधवांनी देणगी स्वरूपात व वस्तू स्वरूपात मदत  दिली त्या सर्वांचे युवाच्या वतीने आभार मानन्यात आले.  कार्यक्रमाच्या यशस्वतीसाठी काथार वाणी समाजा सेवा संघाचे अध्यक्ष संतोष बाविस्कर, एम.के.एफ.चे नंदकिशोर कामळस्कर, राहल हरणे, प्रशांत वाणी यांनी मोलाच सहकार्य केले. कार्यक्रमासाठी युवाचे संस्थापक अध्यक्ष योगेश वाणी, अध्यक्ष- श्री. प्रशांत वाणी , उपाध्यक्ष राजेश वाणी, सचिव- गणेश डाळवाले युवा सदस्य अजय कामळस्कर, अमोल वाणी, मनिष धर्मराज वाणी, उदय वाणी, शंकर वाणी, अनंत वाणी, डॉ. रविंद्र नांदेडकर, मनिष वाणी, सुधाकर वाणी, दिपक वाणी, योगेश वाणी, रविंद्र वाणी, सुनिल वाणी यांनी वधु – वर परीचय मेळाव्यासांठी मोलाचे योगदान व सहकार्य केले. आभार राजेश वाणी यांनी मानले.

 

Protected Content