Home धर्म-समाज यावलमध्ये हनुमान जयंतीनिमित्त श्री बालाजी रथोत्सवाला सुरुवात

यावलमध्ये हनुमान जयंतीनिमित्त श्री बालाजी रथोत्सवाला सुरुवात


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला यावल येथील श्री बालाजी रथोत्सव आणि खंडोबा महाराजांची यात्रा यंदाही उत्साहात साजरी करण्यात आली. हनुमान जयंतीच्या निमित्ताने हडकाई (हरिता) नदी पात्रात पारंपरिक पद्धतीने श्री व्यास महाराज मंदिरासमोर विधीवत पूजन करीत श्री बालाजी रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली.

संध्याकाळी सुरू झालेला रथोत्सव रात्री उशिरापर्यंत चालला, यामध्ये हजारो भाविकांनी रथाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पारंपरिक वाद्यांचे निनाद, टाळ-मृदंग आणि भक्तगितांच्या गजरात रथ ओढण्यात आला. दरम्यान, खंडोबा महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर चोपडा रोड ते डांगपूरा मस्जिदपर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या. या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे बारागाड्यांची रंगीत मिरवणूक होती, ज्यात विविध पारंपरिक पोशाखातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.

रथोत्सव आणि यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी फैजपूर विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, उपनिरीक्षक सुनील मोरे, राजेंद्र साळुंके, पिराजी वाघमोडे, रशीदा तडवी, अस्लम खान, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे आणि पोलीस व गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी योग्य बंदोबस्त ठेवत अतिशय शिस्तबद्ध व्यवस्था सांभाळली.


Protected Content

Play sound