भुसावळ प्रतिनिधी । श्रावण महिन्यातील आज दि.5 ऑगस्ट रोजी पहिला सोमवार व नागपंचमी असल्याने भाविकांनी पहाटे पासुनच येथील मंदिरांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विशेष म्हणजे यावर्षी पहिल्या श्रावण सोमवारीच नागपंचमी आल्याने हा दुर्मिळ योग भक्तांसाठी विशेष पर्वणी ठरली आहे.
शास्त्रानुसार श्रावण महिना हा महादेवाच्या पुजेसाठी विशेष मानला जातो. तसेच श्रावणी सोमवारी महादेवाचे व्रत करून भक्तांगण शिवाची आराधना करतात. श्रावण महिन्यात महादेवाची उपासना विशेष फलदायी ठरते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.