Home क्राईम चाकूचा धाक दाखवत तरूणाचा मोबाईल व रोकड लांबविली

चाकूचा धाक दाखवत तरूणाचा मोबाईल व रोकड लांबविली


भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील रजा टॉवरजवळ एकाने चाकू दाखवून मोबाईल व खिश्यातील रोकड असा एकुण १२ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरी काढून चोरी केल्याची घटना सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, महेंद्र रामनारायण यादव (वय-२१) रा. मास्टर कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने महेंद्र यावद हा भुसावळ शहरात गेला होता. त्यावेळी शहरातील रजा टॉवर येथे सुरज भांगे रा. भुसावळ याने चाकूचा धाक दाखवत महेंद्रचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकुण १२ हजार २०० रूपये किंमतीच जबरी काढून चोरी केल्याची घटना घडली. घाबरलेल्या अवस्थेत महेंद्र यादव याने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ३ वाजता संशयित आरोपी सुरज भांगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये करीत आहे.


Protected Content

Play sound