चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बोढरे गावात गेल्या वीस दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे. अशात तांत्रिक बाबी पुढे करत ग्रामपंचायतीने गावकर्यांना अक्षरशः वार्यावर सोडले आहे.
सध्या तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे काही गाव अपवाद वगळता काही ठिकाणी पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पाण्याची झळ अद्याप नागरिकांना बसलेली नाही. दरम्यान तालुक्यातील बोढरे ग्रामपंचायतीला दोन ठिकाणांहून पाणीपुरवठा केला जातो. मात्र नेहमीच पाईप लिक किंवा फुटला, मोटार जळाली असे शुल्लक कारणे सांगून गत वीस दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे महिलांसह आता माणसालाही हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
गावात अनेक वयोवृद्ध महिला वा व्यक्ती आहे. ज्यांच्या घरात कोणीही नाही. व गुडघ्यानेही चालता येत नाही. असेही पाणी आणायला एकेक कि.मी.चा पल्ला पार करत आहे. या सगळ्या गोष्टीला कंटाळून नागरिकांचा संयमाचा बांध फुटला आहे. व ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या भोंगळ कारभारावर अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तत्पूर्वी तातडीने गावात पाणी पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत बोढरेचे ग्रामसेवक सतीश बंडगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाणगांव येथे पाईप लिक आहे. यामुळे पाणीपुरवठा करायला अडचणी असून दुसर्या विहीरीचे मला सांगता येणार नाही. तरीही या समस्याचे निराकरण येत्या दोन दिवसात करणार असल्याचे सांगितले आहे. तर आज गावात पाणी येणार असल्याची पुष्टी देखील त्यांनी जोडली. तथापि, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता होत आहे.