Home Uncategorized धक्कादायक : दुचाकीसाठी दोन भावांकडून तरुणाची हत्या

धक्कादायक : दुचाकीसाठी दोन भावांकडून तरुणाची हत्या



लखनऊ (वृत्तसंस्था) फेसबुकवरुन ओळख करत दोन फक्त दुचाकीसाठी दोन भावांनी मिळून एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बरेली येथे घडली आहे.

 

लकी वाजपेयी (वय १७)याने नुकतीच दुचाकी घेतली होती. त्यादुचाकीवर दीपक आणि गगन मेहता या दोघं भावांची नजर पडली. मग ती दुचाकी मिळवण्यासाठी दीपक आणि गगनने फेसबुकवरुन त्यालकीशी मैत्री केली. मैत्री झाल्यानंतर सहा दिवसांनी या दोघांनी त्याला घरी बोलावले आणि त्याची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर लकीचा मृतदेह त्यांनी एका पेटीत बंद केला. पण जेव्हा लकीच्या मृतदेहाचा वास येऊ लागल्याने दोघांनी त्याचा मृतदेह दिल्ली-लखनऊ मार्गावरील झाडी झुडपात फेकला. लकीच्या हत्येनंतर त्यांनी त्याची दुचाकी घेतली. त्यानंतर ती दुसऱ्याला विकली होती. पोलिसांना क्राईम ब्रँचने लकीचे फेसबुक तपासले तेव्हा त्यांना काही माहिती मिळाली आणि त्यांनी गगन आणि दीपकला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी लकीची हत्या आम्ही केल्याचे दोघाभावांनी कबूल केले, असे पोलिसांनी सांगितले. धक्कादायक म्हणजे दोन्ही आरोपींचे वडील रुहेलखंड मेडिकल महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम करतात.


Protected Content

Play sound