Home क्राईम धक्कादायक : थंड पेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर सामूहिक अत्याचार !

धक्कादायक : थंड पेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर सामूहिक अत्याचार !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. एका ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला ही आरोपींची नातेवाईक आहे. ही घटना १३ मार्चते १४ मार्च रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. जळगाव शहरातील एका भागात एका महिलेला दोन संशयित आरोपींनी संगनमत करून पिडीत महिलेला थंड पेयामधून गुंगीकारक औषध दिले. महिला शुद्धीवर नसल्याचा फायदा घेत राजेश शिवराम पवार आणि राजेंद्र शंकरसिंह पवार यांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

हा प्रकार पीडीत महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून आपली फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित आरोपी राजेश शिवराम पवार (रा.मेहरुण) याला बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरा संशयित आरोपी राजेंद्र शंकरसिंह पवार हा फरार झाला आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि गणेश वाघ आणि सपोनि माधुरी बोरसे करत आहेत.


Protected Content

Play sound