Home क्राईम धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार !

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार !


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार करून गर्भवती केल्याची धक्कादायक प्रकार रावेर तालुक्यात उघडकीला आला आहे. याप्रकरणी बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नराधमावर निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, रावेर तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरूणीला संशयित आरोपी अजय बळीराम साळवे रा. गाते ता. रावरे याने लग्नाचे आमिष दाखवत नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२४ च्या कालावधीत वेळोवळी अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत तरूणी ही गर्भवती राहली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पिडीत तरूणीने निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी अजय बळीरा साळवे रा.गीते ता.रावेर याच्या विरोधात गुन्हा दाखलकरण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी संशयित आरोपीला अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound