जयपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पतीच्या उपचारासाठी उधारीने घेतलेले पैसे विवाहितेला फेडता आले नाही म्हणून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर व्हिडीओ बनवून व्हायरल देखील केला. यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पिडीत महिला ही पतीच्या उपचारासाठी पैसा गोळा करत होती. पण पैशाची व्यवस्था झाली नाही. त्यानंतर महिलेने नागौर येथे दिल्ली दरवाजाजवळ राहणाऱ्या मेहरदीनशी संपर्क साधला. मेहरदीन व्याजावर पैसे देतो, असं कोणीतरी महिलेला सांगितलं होते. महिला मेहरदीनकडे गेली. त्याच्याकडून १० हजार रुपये उधारीवर घेतले. महिलेने मेहरदीनला ५ हजार रुपये परत केले. ती दर महिन्याला ५०० रुपये द्यायची. एक दिवस पती बाहेर गेला होता. त्यावेळी मेहरदीन महिलेच्या घरी आला. त्याने तिच्यावर बलात्कार केला व व्हिडिओ बनवला.
त्यानंतर मेहरदीन जोधपूरला महिलेला घेऊन गेला. तिथे तिच्यावर हॉटेल रुममध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे. व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.
सगळ्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. नागौर कोतवालीचे सीआयए रमेंद्र सिंह हाडा म्हणाले की, महिलेने रिपोर्ट दिला आहे. तिने एका युवकाकडून काही पैसे उधारीवर घेतले होते. तिने पैसे परत केले. पण व्याजासाठी तिला त्रास देण्याचा प्रकार सुरु होता. तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.