धक्कादायक : भावाला ठार मारण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार !

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरूणीला लग्न करण्यासाठी दबाव टाकत तिच्या भावाला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्या वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावातील एका भागात १९ वर्षीय तरुणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारा मयूर देवेंद्र गोढरी याने १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर दरम्यान पीडित मुलीला “माझ्यासोबत पळून जाऊन लग्न कर, तू जर आली नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेल” अशी धमकी देऊन तिच्याकडून लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये नोटरीवर सही घेतली.

 

त्यानंतर तिची इच्छा नसताना तिच्यावर जबरी अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत तरुणीने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी मयूर देवेंद्र गोढरी यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.

Protected Content