चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवून गेल्या पाच वर्षांपासून एका तरूणीवर अत्याचार केला. एवढेच नाही तर नराधमाने तरूणीच्या भावीपतीला बोलावून घडलेला प्रकार सांगून तिचे लग्न देखील मोडल्याचा धक्कादायक प्रकार चोपडा शहरात समोर आला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात २३ वर्षीय तरूणी ही वास्तव्याला आहे. पाच वर्षांपुर्वी संशयित आरोपी मनिष विजय पाटील रा. दोंदवाडे ता. चोपडा याने पिडीत तरूणील प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर त्याने तरूणीशी लग्न करण्यास नकार दिला. ही घटना घडल्यानंतर मात्र तरूणीने कोणतीही तक्रार केली नाही. दुसरीकडे तरूणीचे लग्न ठरले होते.
त्यावेळी देखील त्याने पिडीत तरूणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावर तरूणीने नकार दिला म्हणून तिचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी तिच्या भावी पतीला संशयित आरोपी मनीष पाटील यांने बोलावून तिचे लग्न मोडले. या त्रासाला कंटाळून विवाहितेने अखेर चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी मनिष विजय पाटील रा. दोंदवाडे ता. चोपडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.