जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबईत पोलीस दलात नोकरीमध्ये असलेल्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील एकाने वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील कल्याण परिसरात राहणारी ३१ वर्षीय तरुणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मुंबई पोलीस दलातील नोकरीला आहे. दरम्यान जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील राहणारा महेंद्र ठाकूर याने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत ८ ते ११ जानेवारी दरम्यान वारंवार अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी २३ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता संशयित आरोपी महेंद्र ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहे.