जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय महिला ही शौचालयास बसलेली असतांना एकाने तिला शेतात ओढत नेत तिचे विवस्त्र फोटो काढून धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता गावाच्या बाहेर शौचालयाला बसलेली असतांना गावात राहणारा संशयित आरोपी विनोद दोधु मेढे याने पिडीत महिलेचा हात पकडून तिला शेतात ओढून नेत तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढले. त्यानंतर महिलेला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. संशयित आरोपी याने हा फोटो एका नातेवाईकाला पाठविला. त्या नातेवाईकाने तो फोटो पिडीत महिलेच्या नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. हा प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात विनोद दोधु मेढे यांच्यासह एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दिन सैय्यद हे करीत आहे.