धक्कादायक : शरीरसुखाची मागणी करत महिलेचा विनयभंग; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरण कंपनीत कंत्राटी महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव येथील महावितरण कार्यालयातील एच.आर. व्यवस्थापक उध्दव कडवे याने विभागातील एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी करत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार महिला कर्मचाऱ्यासोबत सन २०१७ ते २०२१ दरम्यान सुरूच होता. असे असतांना १२ मे २०२२ रोजी देखील महावितरण कार्यालयातील एच.आर. व्यवस्थापक उध्दव कडवे याने पुन्हा महिला कर्मचाऱ्याकडे शरिरसुखाची मागणी करत गैरवर्तन केले. मानसिक छळ व त्रास देत तिला कामावरून काढून दिले. त्याच प्रमाणे कार्यालयातील राजेंद्र आमोदकर रा. जळगाव याने देखील गैरवर्तन करून “मी तुला घरी सोडतो असे सांगून महिलेच्या गळ्यात हात टाकून मला किस दे” असे बोलून तिचा विनयभंग केला.

महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या व्यवस्थापकाविरोधात जळगाव परिमंडळ महावितरण संयुक्त कृती समितीतर्फे द्वार सभा घेवून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला तर व्यवस्थापकाला अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, महिलेने बुधवारी १ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी एच.आर. व्यवस्थापक उध्दव कडवे आणि राजेंद्र आमोदकर दोन्ही रा. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करयात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

 

Protected Content