चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावात राहणारा सोमनाथ प्रकाश चव्हाण याने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी पिडीत मुलीला घरी जबरदस्ती बोलावून घेतले आणि तिच्या अत्याचार केला. हा तिच्यावर अत्याचार केल्याने पिडीत मुलगी ही तीन महिन्याची गरोदर राहिली. हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तातडीने चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सोमनाथ जाधव यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढल तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे करीत आहे.