भोपाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या नवजात मुलाची हत्या केली आहे. हत्येमागचं कारण तितकंच धक्कादायक आहे. व्यक्तीला मुलगी हवी होती, पण मुलगा झाल्याने तो नाराज होता. याच संतापातून त्याने आपल्या बाळाला संपवलं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोडप्याला याआधीच दोन मुले आहेत. तिसऱ्यांदा देखील मुलगा झाल्याने तो संतापला होता. कोटवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बज्जरवाड गावातील रविवारी घडलेला हा प्रकार आहे. तपासात उघड झालंय की, अनिल उईकेने आधी पत्नीला मारहाण केली आणि त्याच्याकडून १२ दिवसांच्या मुलाला हिसकावून घेतलं.
पतीला घाबरुन पत्नी त्याठिकाणाहून पळाली. तेव्हा जी घरी परत आली तेव्हा तिला बाळ घरात मेलेल्या अवस्थेत आढळून आले. बाळाच्या गळ्यावर काही खुना आढळून आल्या आहेत. याप्रकरणी आयपीसीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अनिक उकेईला अटक केली आहे. आरोपीने कबुली दिलीये की, त्याला अगोदरच दोन मुले आहेत. त्याला आता एक मुलगी हवी होती. पण, तिसऱ्यांदाही मुलगा झाल्याने तो संतापला होता.