नवी मुंबई (वृत्तसंस्था) आतापर्यंत एखादं तरुणीवर सामुहिक बलात्कार अशा बातम्या आपण अनेक वेळा ऐकल्या असतील. परंतू वाशीत चक्क एका तरुणावर चार ते पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. दरम्यान, पिडीत तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.
या संदर्भात अधिक असे की, पीडित तरुण सोमवारी संध्याकाळी वाशीतल्या जागृतेश्वर मंदिराजवळ फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याचे अपहरण केले. त्यानंतर लैंगिक अत्याचार केला. सुरुवातीला तरुण बेशुद्ध पडला होता. शुद्धीवर आल्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आरोपींनी अमली पदार्थांच्या नशेत हे कृत्य केल्याची आशंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.