धक्कादायक : वडील रागावल्याने तरुणीची आत्महत्या

 

suside

 

मुंबई (वृत्तसंस्था) कामावरून घरी उशिरा परतल्यावरून वडिलांनी रागावल्यामुळे संतापाच्या भरात एका तरुणीने इमारतीच्या ६व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील चेंबूरमध्ये घडली आहे. आरती तापसे (वय १८) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

 

चेंबूरमधील म्हाडा कॉलनीतील आरती तापसे ही तरुणी ब्यूटी पार्लरमध्ये काम करत होती. रात्री घरी उशिरा आल्याने वडिलांनी मुलीला ओरडले. त्याचा रागा आल्याने संतापाच्या भरात आरतीने आत्महत्या केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या मुलीच्या आत्महत्येचा थरार कैद झाला आहे. या घटनेनंतर आरतीला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Protected Content