मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील दहिसर येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या बैठकीमध्ये झालेल्या वादातून अध्यक्षाने दाताने सदस्याच्या हाताचा अंगठा तोडल्याची घटना घडली. या घटनेनंतर सदस्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे. दहिसर येथील पश्चिम म्हात्रेवाडीत आज ४ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी ही घटना घडली.
मुंबईतील दहिसर येथील पश्चिम म्हात्रेवाडी येथील अमरनाथ अपार्टमेंटमध्ये आज सकाळी सोसायटी अध्यक्षांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होत. या बैठकीत अध्यक्ष नित्यानंद परिहार आणि सदस्य आदित्य देसाई वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत नित्यानंद परिहार यांनी चक्क दाताने आदित्य देसाई यांचा अंगठा तोडला. आदित्य देसाई यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांच्या हाताला ड्रेसिंग केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.