कोल्हापुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोल्हापुरातील राधानगरी येथे मुलाने आईची हत्या केली आहे. आईच्या डोक्यात कुदळ मारल्याने आईचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मुलगा संदीप मुसळे याला राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे. मालुबाई मुसळे असं मृत्यू झालेल्या आईचं नाव आहे. सोमवारी दुपारी बारडवाडी येथे ही घटना घडली. यामुळे राधानगरी परिसरात मोठी खळभळ उढाली.
याबाबत मिळाली माहिती अशी की, बारडवाडी इथं श्रीपती मुसळे, मालुबाई मुसळे आणि मुलगा संदीप शेतात भात पेरणीसाठी गेले होते. शेतात काम करताना मुलाचा आई-वडिलांसोबत वाद झाला. याच वादानंतर संदीपने वडिलांना कुदळीने मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आईच्या डोक्यात कुदळ लागली. घाव वर्मी लागल्यानं संदीपची आई मालुबाई या जागीच कोसळल्या आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. संदीप आणि त्याचे वडील श्रीपती यांना दारुचे व्यसन आहे. संदीप सेंट्रिंग काम करतो. शेतात पेरणी सुरू असताना झालेल्या वादातून त्याने कुदळ मारल्याने आईचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून संदीपला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.