मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुनील केदार यांच्या रुपात काँग्रेस पक्षास विधानसभा निवडणूक २०२४ पूर्वी जोरदार धक्का बसला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात झालेली शिक्षा स्थगित करावी, यासाठी केदार यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे केदार यांची विद्यमान आमदारकी रद्द झाली आहे आणि पुढची निवडणूक धोक्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना तब्बल 5 वर्षांचा सश्रम कारावस आणि 12.50 लाख रुपयांचा दंड ठोठाविण्या आला आहे. न्या. उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठाने ४ जुलै रोजी गुरुवारी हा निर्णय दिला.
सुनिल केदार हे काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत. विदर्भात त्यांचा मोठा प्रभाव आहे. या प्रभावातूनच लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये काँग्रेसला विदर्भात दणदणीत यश मिळाले. मात्र, आता या शिक्षेच्या रुपात काँग्रेसला एक मोठाच झटका बसल्याचे मानले जात आहे. केदार यांच्यासह सहा जण एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणात दोषी आढळले. त्यामुळे या प्रकरणात नागपूर खंडपीठाने 22 डिसेंबर 2023 मध्ये पाच वर्षांचा सश्रम कारवास आणि साडेबारा लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील केदार आणि इतर सर्वच आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.