मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | सध्या राज्यात आणि देशात काँग्रेस नेते पक्ष सोडून भाजप, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदेच्या शिेवसेनेत जात आहेत. आता काँग्रेस पक्षाची भूमिका मांडणाऱ्या नेत्याने सुध्दा काँग्रेस पक्षाला रामराम करत राजीनामा देऊन शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेसवर टीका ही केली. काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे पक्षाची अवस्था वाईट झाली आहे.
काँग्रेस पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली दबलेला पक्ष झाला आहे. सांगली आणि भिवंडी येथील जागेबाबत असाच निर्णय झाला. भिवंडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. या सर्व प्रकाराचा परिणाम माझ्यावर झाला आहे. यामुळे मी कॉमन मॅन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश घेत आहे. भविष्य काय आहे, हे भविष्य दाखविण्यासाठी आज चांगलं दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास काय आहे, हे दाखवून दिले आहे. त्यांनी कमी वेळेत राज्याचा मोठा विकास केला आहे. आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्री यांनी असे काम केले नाही. हे विरोधकांना देखील मान्य करावे लागेल असे ते यावेळी म्हणाले.