गोंदिया-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना पक्षाचा राजीनामा दिला आहे. अग्रवाल हे काँग्रेसकडून 3 वेळा विधानसभा व 2 वेळा विधानपरिषद सदस्य राहिले आहे. गोंदिया विधानसभा येथील माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेसमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मात्र गोपालदास अग्रवाल हे पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याचे संकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये अस्वस्थ होते. अखेर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, आता दिल्लीवरून त्यांच्या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. गोपालदास अग्रवाल यांनी 2019 निवडणुकीदरम्यान मोदी लाटेत भाजप प्रवेश केला होता. त्यांना भाजपने उमेदवारीही दिली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते भाजपात अस्वस्थ होते. अखेर त्यांनी आज भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती दिली आहे.