
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोपाळपूरा भागात एका नेपाळी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाल्याची घटना रविवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जोगी सारकी टिक सारकी नेपाली वय ५४ रा. नेरी नाका जळगाव असे मयत झालेल्या नेपाळी व्यक्तीचे नाव आहे.

जळगाव शहरातील गोपाळपूरा भागातील परिसरात जोगी सारकी या नेपाळी व्यक्तीचा मृतदेह रविवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी मिळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून ओळख पटविली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. यावेळी त्यांच्या नातेवाईक व मित्र परिवार यांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप नन्नवरे हे करीत आहे.



