Home राजकीय शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला शोभा डे यांचा विरोध

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला शोभा डे यांचा विरोध

0
22

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास प्रारंभ झाला असतांना ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांनी याला आक्षेप नोंदवून विरोध केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने १०० कोटींची तरतूद केली आहे. महापौरांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील हेरिटेज वास्तूत ठाकरे यांचं स्मारक होणार आहे. त्यासाठी महापौरांचं निवासस्थान राणी बागेतील एका बंगल्यात स्थलांतरित करण्यात आलं आहे. यानंतर काल बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मारकाचे काम सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांनी ट्विटरवरून याला आक्षेप घेतला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला आणखी स्मारकांची गरज नाही. आम्हाला शाळा आणि रुग्णालये हवी आहेत. मला १०० कोटी रुपयांचं अनुदान द्या. यासोबत एक नागरिक म्हणून लोकांच्या हितासाठी त्याचा कसा वापर करायचा हे आपण दाखवून देणार असल्याचे आव्हानही त्यांनी सरकारला दिलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound