जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड हायस्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्त ‘ उत्सव माझ्या राजाचा ‘ कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवकालीन शिवनेरी, रायगड सह 85 गड, किल्यांच्याच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर होते. त्यांच्यासह विचार मंचावर मुख्याध्यापक श्रीधर सुनकरी, प्रा.प्रसाद देसाई, प्रा.प्रज्ञा महाजन आदी उपस्थित होते. यात कथाकथन व पावडा गायन झाले. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या शौर्याची माहिती दिली. अफजल खानचा वध आणि पावड्यांमुळे सर्वांमध्ये शौर्याचे शहारे उभे राहिले. या उत्साहाच्या वातावरणामुळे उपस्थित पालक आणि शिक्षकही भारावले. जिजामाता यांची भूमिका दर्शना वासुदेव महाजन यांनी केली.
बालशिवाजी अखिलेश मनीष धांडे, अफजल खान वध आणि राज्यभिषेक प्रसंगी शिवाजी महाराज यांची भूमिका सोहम दीपक गोरवाडकर या विद्यार्थ्याने साकारली. बाल शिवशाहीर कुशल सुधीर जोशी, अफजल खानच्या भूमिकेत प्रफुल्ल मनोज जैन यांनी केली. सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी, प्रीती बत्तीसे, साधना शिंदे, हर्षदा पाटील, महेश कोळी, अरविंद पाटील, दिपाली बाविस्कर यांनी केले.