रावेर, प्रतिनिधी | शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत शासनाकडून त्वरित मदत मिळण्याच्या मागणीसाठी आज (दि.२५) येथील तहसील कार्यालयात तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनातून शासनाकडे त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतक-यास हेक्टरी त्वरीत ५०,००० रूपये अनुदान मिळावे, शासनाने हमीभाव देऊन खरेदी केंद्रे सुरू करावी व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची शैक्षणिक फी माफ करावी, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनाच्या प्रती राज्याचे राज्यपाल, मुख्यसचिव, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि जिल्हाधिकारी जळगाव यांना देण्यात आल्या आहेत.