चोपड्यात शिवसेनेचे घंटानाद आंदोलन : अरुणभाईंनी दिला इशारा (व्हिडीओ)

adc54d47 224b 4cd9 ad37 9e787355ed92

चोपडा (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर कोणी राजकारण करत असेल आणि कपडे काढण्याची भाषा करत असेल तर कपडे फाडणे ही चोपडा तालुक्याची संस्कृती नाही, गेल्या ५० वर्षांत चोपड्यात अशाप्रकारे राजकारण झालेले नाही आणि कुणाला अशी घमेंड असेल तर आमचेही कार्यकर्ते त्यांना जागा दाखवून देतील, असा सज्जड दम राष्ट्रवादीचे नेते अरुणभाई गुजराथी यांनी शिवसेनेच्या घंटानाद आंदोलनानंतर आज (दि.३०)पत्रकारांशी बोलताना दिला. त्याआधी शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे चोसाकाकडून त्वरित मिळावे, या मागणीसाठी शिवसेनेने आज शहरात घंटानाद आंदोलन केले.

 

शिवसेनेचे घंटानाद आंदोलन :- चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादकांच्या असलेल्या थकित पेमेंटसाठी व संचालक मंडळास जागे करण्यासाठी तालुक्यातील शिवसेनेच्या एका गटाने आज (दि.३०) रोजी सकाळी १०.०० वाजता शहरप्रमुख रामचंद्र (आबा) नारायण देशमुख यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन केले. शहरातील छ. शिवाजी महाराज चौक ते मेन रोड-गोल मंदिर-गुजराथी गल्ली अशा मार्गाने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या घरासमोर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘संचालक मंडळ जागे व्हा, शेतकऱ्यांचे पैसे द्या’ अशा घोषणा देत घंटानाद केला.
यावेळी पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर भादवि कलम ६८ अन्वये कारवाई करत त्यांना अटक केली व कलम ६९ अन्वये जामिनावर मुक्तता केली. तालुकाप्रमुख राजेंद्र (बिटवा) पाटील, न.पा. गटनेते भैय्या पवार, शिवसेना शहरप्रमुख नरेश महाजन, प.स. सदस्य भरत बाविस्कर, युवासेना तालुकाप्रमुख गोपाल चौधरी, उपजिल्हाप्रमुख दीपक चौधरी, नगरसेवक राजाराम पाटील, किशोर चौधरी यांच्यासह सुकलाल कोळी, ॲड.एस.डी. सोनवणे, वासुदेव महाजन, ललित पाटील, सुनील पाटील, उमेश राजपूत, जगदीश मराठे, नंदू गवळी, गोलू मराठे, सुनील बरडिया, विकी शिरसाट, मंगेश पाटील, दिव्यांक सावंत, योगेश पाटील आदी घंटानाद आंदोलनात सहभागी होते.

कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्नशील – गुजराथी :- शिवसेनेच्या या आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना अरुणभाई म्हणाले की,
शेतकऱ्यांच्या प्रश्नाची आम्हाला निश्चित जाणीव आहे. त्यासाठी राष्ट्रवादी पक्ष आणि कारखान्यातील सहयोगी पक्षांचे नेते सतत प्रयत्नशील आहेत. संचालक मंडळापैकी अनेकांनी स्वतः लाखोंच्या ठेवी ठेवल्या असून राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांनीही ठेवी ठेवल्या आहेत. ज्यांच्या शेतात ऊस नाही, अशाही लोकांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी मोठ्या मनाने ठेवी ठेवल्या आहेत. आम्ही शासनस्तरावर पालकमंत्री ना गिरीश महाजन, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आ. जयंत पाटील, माजीमंत्री आ. एकनाथ खडसे, साखर आयुक्त, नाबार्ड अधिकारी, विविध नेते, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्कात असून कारखान्याला मदत व्हावी, कारखाना वाचावा, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. परंतु या आंदोलनाचे नेते असणारे शिवसेनेचे आमदार स्वतः जिल्हा बँकेत संचालक असून त्यांनी याकामी कोणती पावले उचलली ते सांगावे. १ कोटी ८२ लाखांची रक्कम जिल्हा बँकेतून आमदारांनी काढून दिल्यास ७० टक्के शेतकऱ्यांची थकबाकी दिली जाईल, शेतकऱ्यांना आनंद होईल. आम्ही त्यांचाही सत्कार करू परंतु आंदोलन करून हा प्रश्न सुटणार नाही. कारखाना वाचावा म्हणून तालुक्यातील प्रत्येकाने जशी शक्य आहे, तशी मदत करावी. पत्रकारांनीही यासंदर्भात विधायक भूमिका घ्यावी, असे आवाहन यावेळी गुजराथी यांनी यावेळी केले. गुजराथी यांच्या निवासस्थानी झालेल्या या पत्र परिषदेला माजी आमदार जगदीशचंद्र वळवी, पीपल्स बँक चेअरमन चंद्रहास गुजराथी, चेअरमन अतुल ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष गोरख पाटील, जि.प. सदस्य डॉ. नीलिमा पाटील, विजया पाटील, माजी संचालक आनंदराव रायसिंग, माधुरी पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष धर्मेंद्र मगरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ललित बागुल, शेतकी संघ प्रेसिडेंट शेखर पाटील, नपा गटनेते जीवन चौधरी, नगरसेवक रमेश शिंदे, कैलास सोनवणे, हुसेन खा पठाण, चोसाका माजी चेअरमन संभाजी पाटील, चोसाका संचालक प्रवीण गुजराथी, पीपल्स बँक संचालक मोरेश्वर देसाई, नेमीचंद जैन, सुनील बुरड व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content