Home Cities भुसावळ मांडवे दिगर येथे शिवसेनेतर्फे साहित्य वाटप

मांडवे दिगर येथे शिवसेनेतर्फे साहित्य वाटप

0
37
bhusawal krushi din shivsena

bhusawal krushi din shivsena

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील मांडवे दिगर येथे शिवसेनेतर्फे कृषी दिन साजरा करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील मांडवे दिगर येथे शिवसेना शाख तर्फे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा व भिलवडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शिवसेना भुसावळ विधानसभा संघटक निलेश सुरडकर यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी विलास मुळे, जिल्हा संघटक नीलेश महाजन, प्रवीण पाटील, नामदेव बर्‍हाट, भुसावल तुषार बर्‍हाटे, पंकज पाटील, कैलास पवार यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.


Protected Content

Play sound