Home राजकीय मुख्यमंत्रीपदावरून ‘पोस्टर वॉर’

मुख्यमंत्रीपदावरून ‘पोस्टर वॉर’

0
35
poster nashik

poster nashik

नाशिक प्रतिनिधी । भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून येथे फलकबाजी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आमचे ठरले असल्याचे सांगण्यात येत असले तरी याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. यातच सोमवारी भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी युती निश्‍चित असली तरी मुख्यमंत्री हा भाजपचाच बनणार असल्याचा दावा केला. यावरून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने आज नाशिक येथे नगरसेविका किरण गामणे यांनी भाजपच्या कार्यालयासमोर एक फलक लाऊन यावर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound