यावल प्रतिनिधी । येथील शिवसेना आदीवासी सेलच्या वतीने प्रकल्प क्षेत्रात येणार्या अनुकंपाधारकांना तात्काळ शासकीय सेवेत समाविष्ट करून न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी आदीवासी एकात्मीक विकास प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
या संदर्भात शिवसेना आदीवासी सेलद्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या क्षेत्रातील अनेक अनुकंपाधारक हे मागील दहा वर्षा पासुन आपल्या आदीवासी विभागाच्या शासकीय सेवेत समाविष्ठ करण्यासाठी प्रकरण सादर केली असुन आम्हाला वारंवार कार्यालयातुन उडवाउडवीची उत्तरे देण्यात येवुन आमच्याशी वेगळी वागणुक देण्यात येते. आदीवासी विकास प्रकल्प विभागा मध्ये आश्रम शाळेतील व वस्तीगृहातील शेकडो पदे रिक्त आहेत. या शासकीय सेवेच्या पदांवर आपल्या कार्यालयातुन आदेश काढुन रोजंदारीवर माणसे लावण्यात आली असुन मात्र आम्हास अनुकंपाधारकांना न्याय देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. या अनुकंपाधारकांचे आई वडीलांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबात कमाविते व्याक्ति ही बेरोजगार असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी यावल आदीवासी एकात्मिक प्रकल्प विकास कार्यालयाच्या माध्यमातुन अनुकंपाधारकांना न्याय मिळवुन द्यावा आणी त्यांना तात्काळ शासकीय सेवेत समाविष्ठ करण्यात यावे. तसे न झाल्यास शिवसेना व आदीवासी शिवसेना सेलच्या माध्यमातुन तिव्र आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल असा ईशारा आदीवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार( मुन्ना) पाटील, शिवसेने यावल तालुका प्रमुख रवीभाऊ सोनवणे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख पप्पु जोशी, शिवसेना आदीवासी सेलचे यावल तालुकाध्यक्ष हुसैन जहांगीर तडवी, योगेश राजपुत, रईस बिराम तडवी, सागर चोपडे यांच्यासह अनुकंपाधारक अल्लाउद्दीन सलदार तडवी, लुकमान तुराब तडवी, राजु हमदू तडवी यांच्या स्वाक्षर्या आहेत. यावेळी शिवसेने पक्षा च्या पदाधिकार्यांशी बोलतांना प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी सांगीतले की मागील दहा पासुन आपल्या कार्यालयात जी अनुकंपाधारकांचे नोकरी विषयी प्रस्ताव येवुन प्रलंबीत असणार्या अनुकंपाधारकांना त्यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या जेष्ठेनुसार विभागातील सेवानिवृत नंतर रिक्त झालेल्या जागेवर शासकीय सेवेत १०टक्के प्रमाणे समाविष्ठ करण्यात् येणार आहे.