Home Cities धरणगाव धरणगावात प्रभाग क्र.१ व ४ मधील शिवसेनेचे निलेश चौधरी यांच्या प्रचार रॅलीला...

धरणगावात प्रभाग क्र.१ व ४ मधील शिवसेनेचे निलेश चौधरी यांच्या प्रचार रॅलीला प्रतिसाद


b18d2613 7ba7 4adc 96f7 691720c7099c
 

धरणगाव, प्रतिनिधी | शहरातील प्रभाग क्रमांक १ व ४ मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांचा प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

 

आज सकाळी प्रभाग क्र १ व ४ मध्ये शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ यांनी या प्रचार रॅलीचे नेतृत्व केले. यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, पी एम पाटील सर, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, काँग्रेसचे शहर प्रमुख राजेंद्र न्हायदे, कॉग्रेसचे चंदन पाटील, उद्योगपती जीवन अप्प्पा बयस, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, प्रभारी नगराध्यक्ष अंजली विसावे, लिलाबाई चौधरी, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका प्रमुख गजानन नाना पाटील , वासूभाऊ चौधरी, विजूभाऊ महाजन, विलास महाजन, राजेंद्र महाजन, संतोष महाजन,योगेश वाघ, जीवन बयास, राजेंद्र ठाकरे,सुनील चौधरी, सभापती अनिल पाटील.काँग्रेस चे राजेंद्र न्हायदे, रतीलाल नाना चौधरी यांच्यासह शिवसैनिक व कॉंग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound