काम करा अथवा राजीनामे द्या – वाघ

चाळीसगाव प्रतिनिधी । शिवसेना पदाधिकार्‍यांनी काम करा अथवा आपापल्या पदाचे राजीनामे द्या अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी स्थानिक सहकार्‍यांना फटकारले. ते पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आगामी सभेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत बोलत होते.

पाचोर्‍यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा दि.१५ रोजी होत असून सभेच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गुलाबराव वाघ यांनी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यानां कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले की, सत्तेचा योग्य वापर करून जनसामान्याची कामे करा. कामावरच लोक निवडून देतात. शिवसेना ही समाजसेवेतून पुढे आली आहे. जे पदावर राहुन काम करीत नसतील त्यांनी स्वेच्छेने राजीनाते द्यावेत. पदाला न्याय देता येत नसेल तर पदे सोडा, अन्यथा पक्षच कारवाई करेेल, असा इशारा वाघ यांनी दिला. केंद्र सरकारवर शेतकरी, मजुर, सामान्य नागरिक, छोटेमोठे व्यापारी असा कुठलाच वर्ग समाधानी नाही. निवडणुकीत युती होणार नाही. युती झाली तरी जळगाव लोकसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळेल.
या बैठकीस बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहरप्रमुख नाना कुमावत, भिमराव खलाणे, नगरसेविका विजया पवार, जेष्ठ नेते तुकाराम कोळी, नंदकिशोर बाविस्कर तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content