भुसावळ प्रतिनिधी । शिवसेनेचा वर्धापन दिन तसेच योग दिवसानिमित्त दोन दिवसीय चेतना शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यात देवेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित या शिबिरात परीसरातील महिलांनी सर्वांगीण विकासासाठी मनशांती व मानसिक स्थिरता प्राप्त करण्याचा कानमंत्र मिळवला. शारीरिक स्वास्थ मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रणाली या शिबिरात शिकायला मिळाल्या. मानवी आयुष्यात नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन असावा त्यासाठी मानसिक स्थिरता आवश्यक असते असे देवेंद्र पाटील यांनी सांगितले. या शिबिरामध्ये शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख पूनम बर्हाटे, शहर प्रमुख सौ भुराताई रोहिदास चव्हाण, भारती गोसावी, लक्ष्मी खरे, पुष्पा खरे, हिराताई पाटील, रंजना गोसावी, सुनंदा विरगट, पूजा गिरणारे, मंगला ठाकूर, अनिता पवार, आयुमबाई शेख, शोभा भोई, वासंती चौधरी उपस्थित होत्या.
दरम्यान, रविवार, दिनांक १६ जून रोजी संध्या ६ वा. प्रभाकर हॉल येथे ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभ हस्ते चेतना शिबिराचा समारोप होणार असून याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.