Home Cities भडगाव भडगावात शिवसेना बुथ प्रमुखांचा मेळावा

भडगावात शिवसेना बुथ प्रमुखांचा मेळावा

0
40

भडगाव प्रतिनिधी । येथे आज शिवसेना बुथ प्रमुखांचा मेळावा पार पडला. यात पक्षाचे सहसंपर्क प्रमुख आर.ओ. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती

या कार्यक्रमाला पक्षाचे सहसंपर्क प्रमुख तथा माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्यासह विधानसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, प्रा.गणेश पाटील, नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष वसिम मिर्झा, शहरप्रमुख मनोहर चौधरी, तालुका प्रमुख डॉ.विलास पाटील, शहर संघटक डॉ.प्रमोद पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जे.के. पाटील, सहकारसेना तालुकाप्रमुख युवराज पाटील, युवासेना जिल्हा सरचिटणीस लकीचंद पाटील, युवासेना तालुकाप्रमुख रवींद्र पाटील, नगरसेवक अतुल पाटील, जग्गू भोई तसेच महिला आघाडीच्या पुष्पाताई परदेशी, अनिल पवार आदी उपस्थित होते.

सारे मतभेद विसरा- पाटील

याप्रसंगी मनोगतातून आर. ओ. पाटील म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणूका आता उंबरठ्यावर येऊन ठेपल्यात. ह्या निवडणुका म्हणजे आमच्यासाठी युद्धच आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी सारे मतभेद विसरून अखंड व एकजुटीने महाराष्ट्रावर डौलाने भगवा फडकवू या, असे प्रतिपादन माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील यांनी केले.

अन्य मान्यवरांचेही मार्गदर्शन

यावेळी मार्गदर्शन करताना विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील म्हणाले कि, आता दिवस फार कमी आहेत, लढाई जिंकायची आहे. तर आगामी निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी सर्वानी जोमाने कामाला लागावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर प्रमुख मनोहर चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन जे.के. पाटील यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound