नवी दिल्ली वृत्तसंस्था । महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून वाढीव मदत देण्याच्या मागणीसाठी आज शिवसेनेच्या खासदारांनी संसद भवन परिसरात जोरदार आंदोलन केले आहे.
आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. गत काही दिवसांपासून सुरू असणार्या राजकीय घडामोडी पाहता शिवसेना आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे संकेत होते. आणि घडलेली तसेच. शिवसेनेच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सदनात आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रातील शेतकर्यांना वाढीव मदत देण्याची मागणी केली. दरम्यान, शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेतून वॉकआऊट केले. यानंतर खासदारांनी संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळेस जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, राहूल शेवाळे यांच्यासह पक्षाचे सर्व संसद सदस्य सहभागी झाले होते.