पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सकल नाभिक समाज बहुउद्देशीय संस्था, पाचोरा, जि. जळगाव यांच्या वतीने शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी समाज बांधव, महिला व कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवरत्न विर जिवाजी महाले यांचे प्रतिमा पुजन करुन करण्यात आली. यावेळी साहेबराव सैंदाणे, पितांबर नेरपगार, निंबा सोनवणे, रवींद्र चित्ते, राजेंद्र चित्ते, प्रवीण कुवर, कैलास चित्ते, दादा वारुळे, सुधीर वारुळे, दिलीप बिरारी, नितीन शिरसाठ, राजेंद्र जाधव, समाधान सेंदाणे, बारकु चित्ते, फकीरा शिरसाठ, चिंतामण जाधव, रमेश वारुळे, सुनील चित्ते, गजानन जाधव, चेतन चित्ते, योगेश चित्ते, जगदिश सोनवणे, नितीन अहिरे, नरेश गर्गे उपस्थित होते.